झोपेत असलेल्या पत्नीला पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.गणेश शंकर पासलकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी परिसरात १९ सप्टेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. मनीषा गणेश पासलकर (वय २०, रा. भिवरी, पुरंदर) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.

मनीषा गंभीर भाजल्यानंतर तिने रुग्णालयात मृत्युपूर्व जबाब दिला होता. १६ एप्रिल २०१५ रोजी मनीषा आणि गणेश यांचा विवाह झाला होता. सासरची मंडळी त्रास देत असल्याने मनीषाने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने गणेशशी दुसरा विवाह केला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. एका पोल्ट्री फार्मवर काम मिळाल्याने गणेश आणि त्याची पत्नी पुरंदर तालुक्यातील भिवरी परिसरात राहायला आले होते.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा : पुणे : रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याचे ८० टक्के मूल्यांकन पूर्ण

वादातून त्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले होते.या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुनील हांडे यांनी नऊ साक्षीदार तपासले. संपूर्ण खटला मृत्युपूर्व जबाबावर आधारित होता. खोटा गु्न्हा दाखल करून अटक केल्याचा बचाव आरोपीने केला होता.

हेही वाचा : पुणे : जुने मखर द्या, नवीन घेऊन जा ; अनिल कांबळे यांचा अभिनव उपक्रम

तत्कालीन सहायक फौजदार नवनाथ सस्ते यांनी तपास केला. सहायक फौजदार शशिकांत वाघमारे, सहायक फाैजदार विद्याधर निचित आणि सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी साहाय्य केले. साक्ष तसेच मृत्युपूर्व जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.