पुणे : राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानंतर रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील खासगी रुग्णालयांकडून नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी आरोग्य विभागाची पथके करणार आहेत. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, रुग्णालयांकडून वैद्यकीय आस्थापना कायद्यासह इतर नियमांचे पालन होते का, याची तपासणी प्रामुख्याने केली जाईल. आरोग्य विभागाची पथके तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांची यादी एक महिन्यात सादर करतील. याचबरोबर रुग्णालयांना सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. एक महिन्यानंतर पुन्हा तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल.

MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Chargesheet by CBI filed against three including prevention officer in bribery case
लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप

हेही वाचा >>> राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत खासगी रुग्णालये नियमांचे पालन करीत नसून, आरोग्य विभागालाही जुमानत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी राज्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची जबाबदारी प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदांमधील जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नायलॉन मांजा विक्रेत्यंना पकडले

आधीच्या कारवाईचे काय?

पुण्यातील मोठ्या खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे २०२३ मध्ये आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत समोर आले होते. या प्रकरणी रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यानंतर अद्यापपर्यंत या प्रकरणी कारवाई झालेली नाही. आरोग्य विभागाच्या नोटिसांना किती रुग्णालयांनी उत्तर दिले याची माहितीही आरोग्य विभागाने जाहीर केलेली नाही. याचबरोबर नोटिसा दिल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण आरोग्य विभागाचे अधिकारी सातत्याने देत आले आहेत.

तपासणी नेमकी कशाची?

– खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात दरसूची लावली आहे का?

– जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट सुविधा सुरू आहे का?

– अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का?

पुण्यातील खासगी रुग्णालये

पुणे शहर – ८५०

पिंपरी-चिंचवड – ६२५

पुणे ग्रामीण – ३५०

Story img Loader