पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी (२४ डिसेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यानंतर आता आमदार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्वतः रुबी रुग्णालयात जाऊन आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गोरे यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

तानाजी सावंत म्हणाले, “काल अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्वजण पुण्यात आलो. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे रात्री पुण्याहून फलटणला निघाले. फलटणजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाचे कठडे तोडून जवळपास ६० फूट खाली कोसळली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ताबोडतोब येऊन मदतकार्य केलं.”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

“आमदार गोरे यांच्या जीवाला कोणताही धोका नाही”

“सध्या आमदार जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. आमदार गोरे यांच्यासह इतरांचीही तब्येत व्यवस्थित आहे आणि सुधारणा होत आहे. आमदार गोरे यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, त्यांच्यावरील धोका टळलेला आहे,” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“गाडीबाबत मी माहिती घेतली नाही”

अपघातानंतर आमदार गोरेंच्या गाडीच्या एअर बॅग्ज उघडल्या नाही अशीही चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, “गाडीबाबत मी माहिती घेतली नाही. मी केवळ आमदार जयकुमार गोरे यांच्या आरोग्याविषयी बोलेल.”

हेही वाचा : Jaykumar Gore Car Accident: “दादा वाचवा… वाचवा! बघा अपघात…”, अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला सविस्तर घटनाक्रम

“अगदी स्पष्ट सांगायचं तर गोरे यांच्या पत्नीने सांगितलं की, ते आज हसलेदेखील”

“मी आमदार गोरेंशी चर्चा केली. ते स्वतः माझ्याशी बोलले. अगदी स्पष्ट सांगायचं तर गोरे यांच्या पत्नीने सांगितलं की, ते चर्चा करताना आज हसलेदेखील. त्यांची तब्येत चांगली असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. पुढील पाच ते सहा दिवसात ते आयसीयूतून बाहेर येतील,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

Story img Loader