पिंपरी- चिंचवडमधील गॅस रिफिलिंग करताना झालेल्या स्फोटावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पोलिसांवर चांगले संतापले. तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत तंबी दिली आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ताथवडे जेएसपीएम शाळेच्या जवळ अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाले. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील ससूनमधून ड्रग्स माफिया चालते त्याच पद्धतीने पिंपरी- चिंचवडच्या ताथवडे भागात गॅस माफिया चालतो का? असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला आहे. आज सकाळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्फोट झालेल्या ठिकाणी भेट दिली आणि त्याच जवळ तानाजी सावंत यांच शाळा आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी होते, त्यांना तानाजी सावंत यांनी चांगलेच झापले.

हेही वाचा… पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

हेही वाचा… थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविल्यानंतर पुणे विमानतळ व्यवस्थापन अखेर हलले

blob:https://www.loksatta.com/f1a4dbaf-dc16-461a-9f84-b2fc15969c49

पिंपरी- चिंचवडमध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास ताथवडे परिसरात कॅप्सूल टँकरमधून कमर्शियल गॅस रिफिलिंग करत असताना भीषण एका पाठोपाठ एक असे नऊ स्फोट झाले. यामुळे पिंपरी- चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आहे. तात्काळ २४ तासाच्या आत तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी तंबी आरोग्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. ज्या परिसरात ही घटना घडली तिथं कॉलेज, स्कूल आहे. दिवसा घटना घडली असती तर शेकडो जण जखमी झाले असते किंवा आणखी काही घडलं असतं. गॅस रिफिलिंग हे दोन नंबरच आहे. ससूनमध्ये जस ड्रग्स माफिया सुरू आहे. तस इथं माफिया सुरू आहे का? तात्काळ २४ तासाच्या आत या ठिकाणचे तीन ते चार अधिकारी बदलले गेले पाहिजे अशी तंबी सावंत यांनी दिली. या सगळ्या प्रश्नांवर उपस्थित पोलीस अधिकारी हे केवळ होकारार्थी उत्तर देत होते. या प्रकरणी तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister tanaji sawant gave warning to pimpri chinchwad police over illegal gas refilling explosion incident kjp 91 asj
Show comments