पुणे : मागील वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. आता विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे हे रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन अधीक्षक नेमण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत या पदावर तिसरा अधिकारी नियुक्त होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी अधीक्षक बदलण्यात येणार नसल्याचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. आता डॉ. भामरे हे आजारी असल्याने रजेवर गेले आहेत, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरे हे गुरूवारी दुपारपासून रजेवर गेले असून, उपअधीक्षकांकडे सध्या हा कार्यभार देण्यात आला आहे.

आणखी वाचा-Aditya L1 : ‘सूट’ दुर्बिणीद्वारे सूर्याची अतिनील किरणे, तापमानाचा अभ्यास

डॉ. भामरे यांच्याजागी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.किरणकुमार जाधव यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याचा इन्कार केला. ते म्हणाले की, विद्यमान वैद्यकीय अधीक्षक रजेवर गेले आहेत. त्यामुळे उपअधीक्षकांकडे कार्यभार देण्यात आला आहे. नवीन अधीक्षक नेमण्याचा प्रस्ताव सध्या तरी नाही.

विद्यमान अधीक्षक डॉ. भामरे यांनी अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच आजारपणाच्या रजेवर गेले होते. त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक पदासोबत बीजे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद आणि बायोमेट्रिक या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी आता अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी अधिष्ठाता ठाकूर यांच्याकडे केली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त देताच डॉ.ठाकूर यांनी डॉ. भामरे यांना अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करीत केवळ वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविली होती.

आणखी वाचा-प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे स्थानकावरच करा आता इलेक्ट्रिक वाहन चार्ज

रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा बोजवारा

ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज हजारो नागरिक येतात. आजारपणाव्यतिरिक्त इतर सरकारी प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. यात अपंगात्वाची प्रमाणपत्रे, वैद्यकीय प्रतिपूर्ती यासह इतर महत्त्वाची कामे असतात. मागील वर्षभरात पाच अधीक्षक रुग्णालयाने पाहिले आहेत. या अदलाबदलीच्या खेळात नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबत आहेत. याचबरोबर ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

ससून रुग्णालयाचे विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे हे रजेवर आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार वैद्यकीय उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. सध्या तरी नवीन वैद्यकीय अधीक्षक नेमण्याचा प्रस्ताव नाही. -डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय