एल्गार परिषदेच्या खटल्यातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होऊ शकली नाही, ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता उद्या (बुधवारी) त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी यासंदर्भात आपले म्हणणे न्यायालयामध्ये मांडले.
विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. तर सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आणि आरोपीचे वकील रोहन नहार यांनी या सुनावणीत काम पाहिले.
पुणे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार आनंद तेलतुंबडे यांच्यावर माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.