पुणे : राज्यभरात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ६६.६७ टक्क्यांवर गेला आहे. मराठवाड्यातील धरणांत जेमतेम २५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये सुमारे ६६.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४८२५४.८३ दलघमी असून, ३४६५९.७२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्यात कोकण विभाग आघाडीवर आहे. कोकणातील धरणांमध्ये सरासरी ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ३८६७.६८ दलघमी असून, पाणीसाठा ३४६१.९६ दलघमी इतका झाला आहे.

पुणे विभागातील धरणांमध्ये ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची पाणी साठवण क्षमता १८३४५.८६ दलघमी असून, पाणीसाठा १५६७७.३८ दलघमी इतका झाला आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये ६०.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची साठवण क्षमता ६८१०.५४ दलघमी असून, पाणीसाठा ४४१६.०७ दलघमी झाला आहे.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Sale of Jagannath Baba Sansthans land without permission Former MLAs allege against Mahavikas Aghadi candidate
वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

हेही वाचा…आमदार, खासदारांची निवृत्तीवेतन बंद करा; भारतीय जवान किसान पार्टी, शेतकरी संघटनेची मोर्चाद्वारे मागणी

नागपूर विभागात ७४.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची साठवण क्षमता ५५७८.६१ दलघमी असून, पाणीसाठा ४३९५.१४ दलघमी झाला आहे. अमरावती विभागात ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणी साठवण क्षमता ४५५६.५२ दलघमी असून, पाणीसाठा ३११३.५३ दलघमी इतका झाला आहे.

हेही वाचा…लोणावळा: मद्यधुंद पर्यटक २०० फुट उंच डोंगरावरून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उतरला! मित्रांसोबत झाला होता किरकोळ वाद

मराठवाड्यातील धरणांत २५ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर विभागातील म्हणजेच मराठवाड्यातील धरणांमध्ये जेमतेम २५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ९०९५.६३ दलघमी असून, ३५९५.६४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ४४ मोठ्या धरणांमध्ये २७.१९ टक्के. ८१ मध्य प्रकल्पांत २८.६८ टक्के आणि ७९५ लहान प्रकल्पांत १९.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ४४.६७ टक्क्यांवर गेला आहे. नांदेड येथील विष्णुपुरी धरण तुडुंब भरले आहे. उर्वरित धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.