पुणे: जिल्ह्यातील २२ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळीतही अशाच प्रकारे धरणांच्या परिसरात पाऊस पडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरासह जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात २६ धरण प्रकल्प आहेत, त्यापैकी २२ धरणांच्या परिसरात पाऊस पडला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणक्षेत्रात २५ मिलिमीटर, वरसगाव आठ, पानशेत दहा, तर खडकवासला धरण परिसरात १३ मि. मी. पावसाची नोंद झाली.

हेही वाचा… चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे खबरदारीचे पाऊल

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात २५ मि.मी. पाऊस पडला. याशिवाय जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, चिलेवाडी, चासकमान, भामा आसखेड, कळमोडी, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, मुळशी, गुंजवणी आणि भाटघर या धरणांच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.