पुणे : बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओदिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे विदर्भात मागील २४ तासांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आज, शुक्रवारपासून पावसाचे पुनरागमन होणार असून, पुढील तीन दिवस म्हणजे १८ सप्टेंबपर्यंत संततधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे शुक्रवारी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया  या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.