पुणे : सिक्कीम ते मध्य महाष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या २४ तासांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारपर्यंत (२७ सप्टेंबर) संपूर्ण राज्याला पिवळा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, पावसाचा जोर विदर्भात जास्त राहणार असून उर्वरित राज्यात जोर कमी राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयाच्या पायथ्यापासून ते पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून मध्यप्रदेशपर्यंत मोठा पाऊस झाला. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. या पट्टयाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात जोर राहील, तर उर्वरित राज्यात पावसाचा कमी जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Weather forecast for North Maharashtra Marathwada Vidarbha
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
weather department has predicted that the cold will subside in Maharashtra state
पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा, हवामानात होणार असे बदल…
cold wave in Jammu Kashmir
राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची लाट
donald trump policies
लेख : घोंघावणारी आर्थिक वादळे!
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली

हेही वाचा : महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

दरम्यान, गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बीड, नंदूरबार, सातारा, जळगाव, धुळे, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, रायगड, नगर, नाशिक, सांगली, नांदेड, नागपूर असा सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचा पाऊस हा मोसमी पाऊसच असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास ५ ते १० ऑक्टोबरचा कालावधी उजाडणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून २६ लाखांचा अपहार

पिवळा इशारा २४ ते २७ सप्टेंबर

  • विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला)
  • मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड)
  • मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा (२६), सोलापूर (२७),
  • उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव)
  • कोकण (रत्नागिरी, रायगड, ठाणे)

Story img Loader