पुणे : पोषक हवामानामुळे सोमवारी (२४ जुलै) किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, की पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, पूर्व विदर्भाच्या बहुतांश भागात जोरदार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
La-Nina, La-Nina active, effect on India ,
अखेर ला – निना सक्रीय, पण कमकुवत; जाणून घ्या, भारतावरील परिणाम
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Rain in North Konkan Meteorological Department has predicted Mumbai news
उत्तर कोकणात आठवडा अखेरीस पाऊस? जाणून घ्या, हवामान विभागाचा अंदाज काय
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा

हेही वाचा >>> साताऱ्यातील महाबळेश्वर व जोर येथे विक्रमी पावसाची नोंद; पावसाची संततधार सुरूच

अकोल्यात १०७, महाबळेश्वरात १६४ मिमीची नोंद

रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या  आकडेवारीनुसार, अकोल्यात १०७.९, अमरावतीत १५.६, बुलडाण्यात २, गडचिरोलीत ३, गोंदियात २.२, नागपुरात ६.७, वर्ध्यात २३.४, यवतमाळमध्ये २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभरात विदर्भात पावसाचा जोर कमी झाला होता. कोकण किनारपट्टीवर डहाणूत १३.९, हर्णेत ३७.२, कुलाब्यात ३५.२, सांताक्रूजमध्ये ४८.६, रत्नागिरीत ६४ मिमी पाऊस झाला. मुंबईत रविवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. मध्य महाराष्ट्रात घाट परिसर वगळता अन्य ठिकाणी हलका पाऊस सुरू होता. कोल्हापुरात ४७.७ मिमी तर महाबळेश्वरमध्ये १६४ मिमीची नोंद झाली. मराठवाड्यात रविवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या.

हेही वाचा >>> सांगली: पावसाची संततधार सुरुच; चांदोलीत ७० टक्के पाणीसाठा

ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे – पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, रायगड. रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

यलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे – ठाणे, मुंबई, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

Story img Loader