लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पुणे आणि परिसरात रात्री बारा वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे. मगरपट्टा सिटीत ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

मोसमी पावसाच्या यंदाच्या हंगामात म्हणजे जूनपासून ऑगस्टअखेर पुण्याला संततधार पावसाने हुलकावणी दिली होती. हंगामात पहिल्यांदाच अशा प्रकारचा संततधार पाऊस पुण्यात होत आहे. त्यामुळे पुणेकर सुखावले आहेत.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमधील पदपथ घेणार मोकळा श्वास

रात्री साधारण बारानंतर सुरू झालेला संततधार पाऊस सकाळी दहा वाजेपर्यंत सुरूच होता. या काळात सर्वाधिक पाऊस पावसाची नोंद पिंपरी चिंचवड परिसरात झाली असून, ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल मगरपट्टा सिटीत ५४ मिलिमीटर पावसाचे नोंद झाली आहे. लोहगावात ३१.८, शिवाजीनगरमध्ये १९.६ आणि पाषाणमध्ये १२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in pimpri chinchwad pune print news dbj 20 dvr
Show comments