पुणे : खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी रात्रीनंतर विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोमवारी सकाळी भिडे पूलावरुन पाणी वाहून लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला.
हेही वाचा…गंज पेठेतील हाणामारीचे मूळ पनवेलच्या बारमध्ये!
भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. पाणी ओसरल्यानंतर पूल वाहतुकीस खुला करून दिला जाईल, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.