Heavy Rain Alert Pune : पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
रात्रभर मुसळधार पाऊस झाला पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. एका पाठोपाठ झाड कोसळण्याच्या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवण्यात आल्या.
हे ही वाचा… पिंपरी : शहरातील शाळा बंद, आपत्कालीन यंत्रणेने दक्ष राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
हे ही वाचा… पुणे शहरात पावसाचा हाहाकार; पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
भवानी पेठेतील वटेश्वरभवन जवळ मोठे झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. वडगाव शेरी भागातील आनंदनगर येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.