पुणे : परतीच्या पावसाने लोणावळ्याला सोमवारी दुपारी झोडपले. विजांचा कडकडाट, गडगडासह मुसळधार पाऊस झाला. लोणावळा शहर आणि खंडाळा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. लोणावळा परिसराला दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने झोडपले.

हेही वाचा >>> पुण्याला झोपडून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय?

हेही वाचा >>> पुणे: जलमय कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून भर पावसात रात्रभर अविश्रांत दुरुस्ती कामे

पाहा व्हिडीओ –

सोमवारी एका तासात ४५ मिलिमिटर पाऊस कोसळला. मंगळवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तासभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. गुरुद्वारा रस्ता, मगनलाल चिक्कीसमोरील रस्ता, मावळा पुतळा चौक, लोणावळा बसस्थानक, शहानी हॉलिडे होमसमोरील रस्ता पाण्याखाली गेला होता. लोणावळा, खंडाळा, कामशेत परिसराला परतीच्या पावसाने झोडपले. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.