पुणे : मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी दिवसभर विदर्भात तुरळक ठिकाणांचा अपवाद वगळता हलक्या सरी पडल्या. पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र

समुद्रसपाटीवरील गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टी सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर कायम आहे. त्यामुळे किनारपट्टी, घाट परिसरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह किनारपट्टी आणि घाट परिसरात मध्यम ते मुसळधारेचा अंदाज आहे.

सोमवारी दिवसभरात डहाणूत ७१, कुलाबा ३५ सातांक्रुज १९, रत्नागिरी १४ आणि महाळेश्वरात ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागात पावसाचा फारसा जोर नव्हता

मंगळवारसाठी इशारे

लाल इशारा – रत्नागिरी, सातारा

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे

पिवळा इशारा – मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ