लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या २४ तासांपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली. ३ जुलैपर्यंत या भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या चार दिवसांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. मात्र, मराठवाड्यात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती नसल्याने त्या भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी ९५ टक्के देश व्यापला असून हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग काबिज करण्याचे बाकी आहे. आगामी दोन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण देश व्यापण्याचा अंदाज आहे. त्यानंतर काही दिवसांत हे वारे हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर ५ ते ६ जुलैपासून देशभरात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने नोंदविला आहे.

आणखी वाचा-इंद्रायणी प्रदूषणमुक्त करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील शनिवारचा पाऊस मिलिमीटरमध्ये

कोकण – रत्नागिरी १२०, हर्णे १००, लांजा ९८, पाली ९४, मंडणगड ८९, राजापूर ८०, माथेरान ७९, पनवेल ७७, माणगाव ७७, महाड ७७, पालघर ७६, चिपळूण ६७, म्हसळा ६६, रोहा आणि उल्हासनगर ६५, दापोली ६४, डहाणू ६३, जव्हार ६२, गुहागर ६१, विक्रमगड आणि श्रीवर्धन प्रत्येकी ६०, तलासरी ५६, पेण, उरण आणि वाकवली प्रत्येकी ५५, सावडे आणि कल्याण प्रत्येकी ५३, मुरबाड ५०, तळा ४५, दोडामार्ग ४५, अंबरनाथ ४४, पोलादपूर ४३, कर्जत ४२, कणकवली ४१, खालापूर आणि मुरुड ३९, यावल ८५, महाबळेश्वर ७९, बोदवड ७५, गगनबावडा ७२, शाहूवाडी ५९, अमळनेर ५४, वेल्हे ४९, लोणावळा ४४, राधानगरी ३७, हर्सुल २८, पालम २०, सोनपेठ १७, लोहा १४, धर्माबाद १२, हदगाव ११, धालेगाव, गंगाखेड आणि वसमत प्रत्येकी १०, गोंदिया ७५, तेल्हारा ४१, बुलडाणा ३९, शेगाव ३७, अकोट ३३, संग्रामपूर ३१, जळगाव आणि मलकापूर २८, कामठी २५, मोताळा २३, अंबोणे १४४, कोयना ९७, डुंगरवाडी ५३, नभरा ५०, शिरगाव ४५, दावडी ४४, ताम्हिणी ५८, लोणावळा ३७.