पुणे : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज, २५ जुलै ते २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस सक्रिय होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुजरातमधील कच्छ परिसरात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. प्रामुख्याने किनारपट्टीसह, मुंबई, पश्चिम घाटाचा परिसर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हेही वाच – पश्चिम महाराष्ट्रात १४४ गावांना दरडींचा धोका; सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात
सांताक्रुजमध्ये १०१ मिमी पावसाची नोंद
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या मागील २४ तासांत किनारपट्टीवर अलिबाग ४५.८, डहाणू ३७.५, हर्णे ३१.८, कुलाबा ४४.६, सांताक्रुज १०१.५, रत्नागिरी २७.५ मिमी पाऊस झाला. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. विदर्भात पावसाचा जोर कमी होता. अमरावतीत २३.६, वर्धा १४.६ आणि वाशिममध्ये ४९ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात सोमवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात दिवसभर हलक्या सरी सुरू होत्या. महाबळेश्वरमध्ये ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा – पुणे: अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची रिक्षा चालकास मारहाण, व्हिडिओ व्हायरल
ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे</p>
यलो अलर्ट
संपूर्ण विदर्भ, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी