पुणे : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक पूल, साकव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूलावरून पणी वाहत असताना त्यावरून जाणे टाळावे, दरडप्रवण गावांत कर्मचारी, सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या गावांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४०० नागरिकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे. कोणत्याही गावाचा अद्याप संपर्क तुटलेला नाही. लोणावळा परिसरात काळजी घेण्यात येत आहे.

हेही वाचा…पुणे : चार तासात होत्याचे नव्हते झाले…

जिल्ह्यातील खेड, जुन्नर आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा परिसरातही मुसळधार पाऊस पडला आहे. या ठिकाणच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात खासगी ऑफिसेसना सुटी देण्याचे आदेश दिल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये सुरू आहेत. मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आदरवाडी गावात शिवाजी बहीरट यांचा मृत्यू झाला असून जितेंद्र जांबूरपाणे जखमी झाले आहेत. पुणे शहरात नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. लवासा मुळशी रस्त्यामध्ये दरड कोसळल्याने तीन व्यक्ती अडकल्याची माहिती असून तेथे काम सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…पुणे : शहरातील पूल झाले ’पिकनिक स्पॉट’, मुठेचा पूर पाहण्यासाठी अलोट गर्दी

वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग

-राज्यमार्ग (१०३) खेड तालुक्यातील उरण पनवेल भोरगिरी वाडा, खेड पाबळ शिरूर रस्त्यावर दरड कोसळल्याने बंद

-राज्यमार्ग (१३३) मावळ तालुक्यातील खडकवासला डोणजे  खानापूर पाबे रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद

-जिल्हा मार्ग :  सोमाटणे शिरगाव दारुंब्रे कासारसाई पाचाणे पुसाणे ओव्हळे रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद

-जिल्हा मार्ग :  वडगाव कातवी वराळे माळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५५ ला जोडणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद

-जिल्हा मार्ग  : अैंढे देवळे पाटण बोरज पाथरगाव रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद

-जिल्हा मार्ग  : कामशेत नाणे गोवित्री थोरण जांभवली कोंडेश्वर रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद

-जिल्हा मार्ग :  एखविरा देवी पायथा मंदिर ते कार्ला मळवली भाजे लोहगड ते  जिल्हा मार्ग २६ ला जोडणारा मार्ग पर्यायी वाहतूक वळविल्याने बंद

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains lead to floods bridge and tourist spots closures in pune and landslides district collector issues precautions pune print news psg 17 psg