पुणे : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहेत. हवामान विभागाने मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी पिवळा आणि नारंगी इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. मराठवाड्यापासून कन्याकुमारीपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यावर बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. राज्यभरात दुपारपर्यंत तापमान वाढते. तापमान वाढीमुळे ढगांची निर्मिती होते. या ढगाची उंची जास्त असलेल्या ठिकाणी गारपीट, तर उंची कमी असलेल्या ठिकाणी पाऊस पडतो आहे.

हेही वाचा >>>साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

रविवारी पुणे, सातारा आणि नांदेडला अवकाळीसाठी, तर अवकाळी आणि गारपिटीसाठी अकोला, अमरावती, नागपूर, वाशिमला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी अवकाळीसाठी कोल्हापूर, सांगलीला, तर अवकाळी आणि गारपिटीसाठी अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्ध्याला नारंगी इशारा दिला आहे. नारंगी इशारा दिलेल्या ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा जोर जास्त राहणार आहे.

२९ जिल्ह्यांत आठवडाभर पाऊस

संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर यांसह २९ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार, १८ मेपर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण

महाराष्ट्रावर कमी दाबाची रेषा तयार झाली आहे, ती पश्चिमेकडे म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे गुरुवार, १६ मेपर्यंतच्या मुंबई, उपनगरसह किनारपट्टीवरील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे.