पुणे : गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शहरातील मध्यभागात ५ ते १८ सप्टेंबर कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विशेषत : व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहने शहराबाहेर उतरावीत. त्यानंतर छोट्या वाहनातून साहित्य मध्यभागात आणावे. जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
जड वाहनांना बंदी घातलेले रस्ते पुढीलप्रमाणे – शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका चित्रपटगृह , टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चित्रपटगृह चौक, कुमठेकर रस्ता – शनिपार ते अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते अलका चित्रपटगृह चौक, केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चित्रपटगृह चौक, बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चाैक, छत्रपती शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक, सिंहगड रस्ता- राजाराम पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मुदलीयार रस्ता, गणेश रस्ता, पॉवर हाऊस चौक ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
हे ही वाचा… पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा…
गणेशोत्सवात मध्य भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीतजड वाहने शहरात आणू नयेत. उत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा