पुणे : हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने; तसेच अपघाताचे प्रमाण वाढल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला असल्याने चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्मेटसक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अपघातांमध्ये मृत्युमुखी आणि जखमींच्या संख्येतही वाढ होत असल्याने राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक साळवे यांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार आता हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी होणार आहे. अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या सूचनांची कडक अंमलबजवाणी करण्याचे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> आळंदी: माऊलींचा ७२८ वा समाधी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने पडला पार; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

दंडात्मक कारवाईचे वेगळे चलन

दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांनी हेल्मेट घातले नसल्यास ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करावी. मोटार वाहन कायद्यानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विनाहेल्मेट सहप्रवासी अशी वेगवेगळी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही साळवे यांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत.

हेही वाचा >>> जुलै महिन्यात आलेल्या पुराचा अहवाल नोव्हेंबर मध्ये प्रसिद्ध, काय म्हंटले त्यात?

सरकारी कार्य़ालयांमध्ये विनाहेल्मेट आल्यास दंड

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात १ डिसेंबरपासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, महाविद्यालये, तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई करावी. – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकीचालक आणि सहप्रवासी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ चालकावरच दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यापुढे हेल्मेट परिधान न करणाऱ्या सहप्रवाशांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे. दुचाकीचालक आणि सहप्रवासी यांचे वेगवेगळे दंडात्मक चलन असणार आहे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmet wearing will be strictly enforced in pune pimpri chinchwad city pune print news vvp 08 zws