पुणे : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर आणि परिसरात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. मात्र, असे कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. त्यामुळे हा संदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उद्यापासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट कारवाई होणार आहे. त्याकरिता ६०० अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. सर्वांनी सतर्क राहावे, असा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना विचारले असता, हा संदेश बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय

हेही वाचा – पुणे: गौतमी पाटीलचा डान्स बर्थडे बॉयला पडला भारी; आयोजक बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये शहरासह जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येताना हेल्मेट परिधान करावे. हेल्मेट परिधान करून न येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुरुवातीला प्रबोधन करावे. त्यानंतर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिला आहे. मात्र, सामान्य नागरिकांबाबत असे कोणतेही आदेश या बैठकीत देण्यात आलेले नाहीत.

Story img Loader