महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुणे विभागीय मंडळातर्फे समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्य़ांमध्ये मिळून २ लाख ७५ हजार ८०६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकूण ४९९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान काही अडचण आल्यास पुणे विभागाने विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मदतकक्षाशी संपर्क साधावा. पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ८६००५२५९०८ किंवा ९८२२९९१३९१ या क्रमांकावर , सोलापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ९४२०५४२६५४ या क्रमांकावर आणि नगर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ९७६३५५७१३१ किंवा ९९२२३२११९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय मंडळाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help centers for ssc students
Show comments