लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवात होणारी कोंडी हटविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. मंडळाचे कार्यकर्ते वाहतूक स्वयंसेवकांच्या भूमिका बजाविणार आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडळ एककडून गणेशोत्सव कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यावेळी उपस्थित होते.

CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
pune liquor ban ganeshotsav marathi news
मद्यविक्रीबंदीने गुन्हे कमी होणार का? मद्य विक्रेत्यांचा सवाल; पुढील वर्षी जिल्ह्यात बंदीची गणेश मंडळांची मागणी
onion trader attacked robbed of rs 50 lakh cash in ahmednagar city
अडते व्यापाऱ्यांवर हल्ला करत ५० लाखांची लूट; दोघे जखमी,नेप्ती कांदा मार्केटजवळील घटना
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Laxman Hake, OBC, OBC community,
कोणाला पाडायचे – विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले – लक्ष्मण हाके
vasai Bahujan vikas aghadi marathi news
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”

शहराच्या मध्यभागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. प्रमुख मानांची मंडळे मध्यभागात आहेत. उत्सवाच्या कालावधीत राज्यासह, देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक मध्यभागात गर्दी करतात. भाविकांची होणारी गर्दी, तसेच वाहतूक नियोजन करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलीस उपायुक्त गिल यांनी संवाद साधला. मंडळाचे कार्यकर्त्यांनी उत्सव कालावधीत वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिसांना सहाय करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त गिल यांनी बैठकीत केले. त्यानुसार विविध मंडळांच्या कार्यकर्ते वाहतूक नियोजनासाठी सहाय्य करणार आहेत.

आणखी वाचा-पुण्यातील सगळे डॉक्टर अन् हॉस्पिटल संपावर जातात तेव्हा…

उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महावितरणशी संपर्क साधण्यात आला आहे. विद्युत तारांची देखभाल ठेवण्यात यावी, तसेच लटकणाऱ्या विद्युत तारा व्यवस्थित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळे, ढोल पथक, पोलीस, स्वयंसेवक यांच्यात समन्वय असणे गरजेचे असल्याचे पोलीस उपायुक्त गिल यांनी नमूद केले. अनेक गणेश मंडळांसाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

ढोल पथकांमधील सदस्यांची संख्या निश्चित

गेल्या वर्षी मंडळाच्या मिरवणुकीत ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. मिरवणुकीत पथकांची संख्या मर्यादित ठेवावी, अशी सूचना करण्यात आली.