chinchwad- kasba Bypoll Election: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी रविवार पेठेतील मनपा शाळा क्र.९ मध्ये, तर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी नू.म.वी शाळेत मतदान केलं. मतदानानंतर रासने यांनी धंगेकरांच्या आंदोलनावर टीका केली आहे. धंगेकरांचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा टोला रासने यांनी लगावला आहे. तसेच जनता माझ्या पाठीशी असल्याचा विश्वासही रासने यांनी व्यक्त केला आहे. कसबा मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे धंगेकर यांच्यात चुरस आहे.

हेही वाचा- कसबा विधानसभा पोटनिवडणूक : “येडा गबाळा पप्पू बरा, पण…”, महिला मतदाराची भाजपावर टीका

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा कार्यकर्ता या नात्याने मी सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. नगरसेवक म्हणून १५ वर्षे आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून २७ महिने काम केले. पक्षाने दिलेली जबादारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पक्ष नेतृत्वाचा आणि नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवेन, असे रासने यांनी सांगितले. करोना काळात सगळ्या देशात आर्थिक चणचण जाणवत असताना अभय योजनेच्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न पुणेकरांना ठाऊक आहेत. करोना काळात पुणेकरांची केलेली सेवा आता मला भरघोस मतदानाद्वारे आशीर्वाद देऊन जाईल, असे रासने यांनी सांगितले.

हेही वाचा- कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात; सनईच्या स्वरात आणि रांगोळ्यांनी मतदारांचं स्वागत

भाजपाने  पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. याला विरोध म्हणून धंगेकरांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं.

हेही वाचा- पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामात गंभीर तांत्रिक चूक, सुप्रिया सुळेंचा मोठा दावा; म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींनी…”

चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.  दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

Story img Loader