महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे (बीएनसीए) अंधांसाठी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘निवांत अंध मुक्त विकासालया’चे १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापुढे दरवर्षी जागतिक अपंग दिनानिमित्त या वॉक चे आयोजन करण्यात येणार आहे.
पुण्यामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेरिटेज वॉक दरम्यान मुलांना जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर मंदिर आणि शनिवार वाडा दाखविण्यात आला. मुलांना माहिती देण्यासाठी ब्रेल लिपीतील माहिती पत्रके, टॅकटाईल नकाशे आणि थ्रीडी मॉडेल्स वापरण्यात आली. ‘निवांत’च्या मुलांनी स्पर्शाच्या आधारे वास्तू पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाताळेश्वराचे चित्रही काढले. या उपक्रमाची संकल्पना बीएनसीएच्या प्राध्यापिका कविता मुरुगकर यांची होती.

Story img Loader