पुणे : सांगली बाजार समितीत राजापुरी वाणाच्या दर्जेदार हळदीला १५,५०० ते १६,५०० रुपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. २०१०-११ नंतर यंदा प्रथमच हळदीला इतका उच्चांकी दर मिळत आहे.

सांगली बाजार समितीतील हळदीचे व्यापारी गोपाळ मर्दा म्हणाले, सांगली परिसरात राजापुरी वाणाच्या हळदीचे उत्पादन घेतले जाते. राजापुरी वाणाच्या सामान्य दर्जाच्या हळदीला १२,५०० ते १४,५०० रुपयांचा दर मिळत आहे. दर्जेदार हळदीला १५,५०० ते १६,५०० रुपयांचा दर मिळत आहे. २०१०-११ मध्ये हळदीला इतका चांगला दर मिळत होता. त्यानंतर आता तब्बल तेरा वर्षांनंतर हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. यंदाचा हळदीचा हंगाम एप्रिल महिन्यात सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीचे दर पडले होते. जेमतेम सात-आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मराठवाड्यात एप्रिल महिन्यात झालेल्या पावसात हळद भिजल्यामुळे तीन-चार हजार इतक्या अल्प दराने हळद विकावी लागली. उत्पादन खर्चा इतकाही दर मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नाईलाजाने हळदीचे बियाणेही शिजवून टाकले होते. शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रात १४४ गावांना दरडींचा धोका; सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात

उत्पन्नात घट होण्याची शक्यता

देशात दरवर्षी ८५ लाख ते एक कोटी (पन्नास किलोचे पोते) पोत्यांचे उत्पादन होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगडमध्ये हळदीचे उत्पादन होते. यंदा उशिराने आलेला पाऊस आणि पडलेल्या दरामुळे हळद लागवडीत ३० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी सुमारे २५ लाख पोत्यांची घट होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्पादनात मोठी घट होण्याच्या शक्यतेने हळदीच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा – राज्यात पावसाचा आजपासून पुन्हा जोर

निर्यात ४० टक्क्यांनी वाढली

आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीची टंचाई असल्यामुळए मागील तीन महिन्यांत निर्यातीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातून होणारी हळदीची निर्यात बांगलादेश, आखाती, अरबी देश आणि युरोपला होत आहे. सुमारे ३० टक्क्यांनी कमी झालेली लागवड, उत्पादनात होणारी संभाव्य घट आदी कारणांमुळे हळदीला आता उच्चांकी दर मिळत आहे, अशी माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे व्यापारी मनोहरलाल सारडा यांनी दिली.

Story img Loader