पुण्यातील कोरेगाव पार्क या प्रतिष्ठीत भागात सुरू असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणत पाच तरुणींसह दलालांना ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कोरेगाव पार्कमध्ये छापा टाकत हे रॅकेट उघडकीस आणले. ताब्यात घेतलेल्या तरुणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, दलालांकडून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.
पुण्यात याआधीही वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणली आहेत.
आणखी वाचा