पुणे : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर,घाटकोपर, मुंबई), पियूष शरद इंगळे (वय २२, रा. स्पाईन रोड, चिखली,पिंपरी- चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी नऱ्हे परिसरातील भुमकर चौकात तिघे जण अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मिश्रा, व्यास आणि इंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलीग्रॅम एल.एस.डी. असे अमली पदार्थ आढळून आले.

Dombivli crime news
डोंबिवली, कल्याणमध्ये १२ लाखाच्या अंमली पदार्थांसह १९ जणांना अटक, अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Four arrested with drugs worth Rs 200 crore drugs from America
२०० कोटींच्या अमली पदार्थांसह चौघांना अटक, अमेरिकेतून आले होते अमली पदार्थ
Suspect arrested for supplying injection drugs
नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक, वितरण साखळी उघडकीस
Three arrested in mephedrone production case in Vita
विट्यातील मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी तिघांना अटक
मोटार चालकाचा खून करणारे नाशिकमधील चोरटे गजाआड- आळेफाटा परिसरात लूटमारीचे गुन्हे
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
Drug dealer, Katraj, Drug , Charas,
कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त

हेही वाचा – पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून १७ वर्षीय तरुणाचा दोघांनी कोयत्याने वार करून केला खून

आरोपी अंशुल मिश्राने एका महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा साथीदार आर्श व्यास एका विमान कंपनीत कामाला (ग्राऊंड स्टाफ) होता. पियूष इंगळे याने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, सचिन माळवे, विनायक साळवे आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा – पुण्यात सायबर सुरक्षा, ‘डेटा सायन्स’मध्ये गलेलठ्ठ पगाराच्या संधी! सर्वाधिक वेतन कोणत्या क्षेत्रात जाणून घ्या…

ओजीकुश गांजाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत

ओजीकुश गांजाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. गांज्याची लागवड बेकायदा आहे. काहीजण गांजाची लागवड शेतात किंवा दुर्गम भागात करतात. ओजीकुश गांजाची लागवड शेतात केली जात नाही. विविध रायासनिक पदार्थंचा वापर करुन ओजीकुंश गांजाची निर्मिती केली जाते.

Story img Loader