अखिल भारतीय हिंदूू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या अध्यक्षा हिमानी अशोक सावरकर (वय ६७) यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. हिमानी सावरकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळा दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हिमानी या गोपाळ गोडसे यांच्या कन्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण यांच्या स्नुषा होत. त्यांनी आर्किटेक्टची पदवी संपादन केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदूू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या माध्यमांतून त्यांनी काम केले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक तर, २००९ मध्ये कोथरुडमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांच्यावर सहा महिन्यांपूर्वी ब्रेन टय़ूमरची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्या अंथरुणाला खिळूनच होत्या. रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.

Story img Loader