पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाकडून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्या विरोधात कायदा अंमलात आणावा या प्रमुख  मागणीसाठी हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चिंचवड महाविहार चौक ते पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

टिकलीवर श्रद्धा असती तर श्रद्धा आज टिकली असती या फलकाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. हिंदू धर्मियांच्या विरोधात होत असलेला घटनांचा फलकाद्वारे निषेध करण्यात आला.  देशभरात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्या विरोधी कायदा अंमलात यावा या प्रमुख मागणीसाठी पिंपरी- चिंचवडच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील तरुण, तरुणी आणि बालगोपाल सहभागी झाले होते.

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा: ‘ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशनास मूलनिवासी मुस्लिम मंचाचा विरोध; आंदोलनाचा इशारा

वारकरी संप्रदायाच शिक्षण घेणारी मुलं देखील या मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा घेऊन तरुण मोर्चात दिसत होते. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पिंपरी- चिंचवड शहरात पहिल्यांदाच सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा झाला आहे. काही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. हिंदू समाजाच्या मागण्या आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

Story img Loader