प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजल खानाच्या कबर परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर आता पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील मस्तानी दरवाज्यासमोरील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविण्यात यावा अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.
यावेळी आनंद दवे म्हणाले की, शनिवारवाडा बांधण्यात आला त्यावेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा दर्गा किंवा पीर नव्हता. मात्र आपल्या देशातून इंग्रज जाताना त्यांनी अनेक गोष्टींची मोडतोड केली. त्याचाच एक भाग म्हणून इंग्रजांनी शनिवारवाडा परिसरातील मस्तानी दरवाजा समोरील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा बांधला. आता या घटनेला अनेक वर्ष होऊन गेली आहेत. त्यानंतर आम्ही पुणे महापालिका व पुरातत्त्व विभागाकडे या दर्ग्याबाबत माहिती घेतली असता कोणत्याही प्रकाराच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा:अफजल खानाच्या कबरीवरील बांधकाम रात्रीच जमीनदोस्त
त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाबाबत १५ दिवसांत माहिती मिळावी,अशी मागणी पुणे महापालिका व पुरातत्त्व विभागाकडे आम्ही केली आहे. त्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका मांडणार आहोत. मात्र शनिवारवाडा परिसरातील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविला गेला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले.