पुणे : भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे, पण पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी दिली आहे.
हेही वाचा – कसब्यात परिवर्तन, भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे. गेल्या वेळेस या प्रभागात मुक्ता टिळक यांना वीस हाजारांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळेस भाजपा येथून १ हजार ४०० मतांनी मागे पडला. बेगडी हिंदुत्वाच्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारणे आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे याचा राग आमच्यामुळे व्यक्त झाला, असे दवे यांनी सांगितले.