पुणे : देशासमोर सध्या हिंदुत्व आणि अध्यात्माच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचे निर्माण झालेले मोठे आव्हान समाजासाठी घातक आहे. समाजवाद आणि समृद्धीचे भांडण नाही. परंतु, यातून विचारांची कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद आणि भेटीगाठी वाढविणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या विचारधारेवर आधारित विविध चार पुस्तकांचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर, डॉ. लता प्र.म., डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. गेल ऑम्वेट वारसा गटाच्या समन्वय डॉ. नागमणी राव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, कन्या प्राची पाटणकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी राजा नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन

डॉ. आढाव म्हणाले, ‘गेल ऑम्वेट ही एक अमेरिकन मुलगी भारतात येते. इथल्या मातीत मिसळून जाते. तिने सत्यशोधक चळवळीवर संशोधन करून या चळवळीत स्वतःला झोकून दिले. सत्यशोधक चळवळीचा शोध घ्यावा असे भारतातील बाकीच्या डाव्यांना का वाटले नाही? यावेळी डॉ. भारत पाटणकर आणि प्राची पाटणकर यांनी लिहिलेल्या ‘झपाटलेले सहजीवन – परंपरा मोडणारी परंपरा’, प्रा. संजयकुमार कांबळे यांनी संपादित केलेल्या ‘डॉ. गेल ऑम्वेट समाजशास्त्रीय आकलन’ व ‘गेल ऑम्वेट समजून घेताना’ आणि एका इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Story img Loader