हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केल आहे. साहिल मेहबूब शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरणाऱ्या संशयीतांवर पोलिसांची करडी नजर होती. त्याच दरम्यान साहिल शेख हा विना नंबर प्लेटच्या दुचाकी सह सापडला. ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलीस कोठडी दरम्यान त्याने इतर आठ दुचाकी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आल आहे. इतर दोन दुचाकी देखील त्याने चोरल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.

हेही वाचा…मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल

साहिल महबूब शेख याने हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच, चाकण पोलीस ठाणे येथील दोन, खडक पोलीस ठाण्यातील एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. साहिल शेख हा दुचाकी चोरून त्या कमी किमतीत विकत असायचा तसेच याच दुचाकी इतर दुचाकी चोरी करण्याच्या गुन्ह्यात वापरत असल्याचे देखील पोलीस तपासात आढळल आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Story img Loader