पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. या मार्गावर काम करण्यासाठी जी-२० बैठका आणि पालखी सोहळ्यामुळे बॅरिकेडिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. आता काम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंगची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने विलंब होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात पुण्यात जी-२० कार्यगटाच्या दोन बैठका झाल्या. याचबरोबर पालखी सोहळाही पुण्यातून पुढे गेला. यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. आता कृषी महाविद्यालय चौकात २५० मीटर अंतरात बॅरिकेडिंगसाठी परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी अद्याप मिळालेली नाही. बॅरिकेडिंग नसल्याने येथील काम दहा दिवसांपासून बंद आहे.
हेही वाचा >>> पुणे: प्रवाशांसाठी खूशखबर! पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास होणार वेगवान
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग २३ किलोमीटरचा आहे. याच मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर या दरम्यान दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी १.७ किलोमीटर असणार आहे. हा उड्डाणपूल मेट्रोच्या कामाचा भाग असणार आहे. बॅरिकेडिंगला परवानगी नसल्याने हे काम रखडले असून, काम पूर्ण होण्याचा कालावधी पुढे जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
कोंडीतून सुटका नाहीच…
हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत आधीच वाढविण्यात आली आहे. आता बॅरिकेडिंगला परवानगी मिळाली नसल्याने काम रखडले आहे. या मार्गावरील कामास विलंब होत असल्याने गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.