पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण झाल्याचं समोर आलं आहे. घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला. तक्रार दाखल नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Viral Video Shows Fight Between Indian passengers on THAI Smile Airlines
विमान प्रवासात भांडणाऱ्या प्रवाशांचा VIDEO VIRAL; हिंदूंवर होतेय टीका! नक्की काय व कधी घडलं?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Shocking Cricketer fell down on ground while Live match video goes viral
क्रिकेटचा सामना सुरु असताना आयुष्याची मॅच हरता हरता राहिला; तरुणाबरोबर काय घडलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
You can’t escape Jeevansathi. Delhi Metro is playing matchmaker this wedding season funny video
VIDEO: बाई हा काय प्रकार? अविवाहित प्रवाशांसाठी मेट्रोमध्ये अचानक झाली ‘ही’ अनाऊंसमेंट; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Virat Kohli and Anushka Sharma attended Krishna Das Kirtan Video viral
Virat Kohli : विराट कोहली भारताच्या पराभवानंतर रमला कीर्तनात, पत्नी अनुष्काबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल
Tragic! Youth Dies After Falling From 3rd Floor While Filming Slow Motion Reel In UP's Agra
“एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल” रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
Viral video of a man beats another man after telling not to urinate in a public place in delhi
त्याची चूक काय? रस्त्यावर झोपलेल्या माणसाला आधी काठीने मारलं मग…, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – VIDEO : वीस मिनिटे पाण्याचा मारा, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, हडपसर येथे खाजगी बसला आग

हेही वाचा – पुणे : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना

घटनेच्या दिवशी कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला नाही. परंतु, सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांपर्यंत बातम्या आल्यामुळे सांगवी पोलीस तत्परतेने कारचालकाचा शोध घेताना दिसत आहेत.