पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण झाल्याचं समोर आलं आहे. घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला. तक्रार दाखल नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – VIDEO : वीस मिनिटे पाण्याचा मारा, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, हडपसर येथे खाजगी बसला आग

हेही वाचा – पुणे : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना

घटनेच्या दिवशी कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला नाही. परंतु, सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांपर्यंत बातम्या आल्यामुळे सांगवी पोलीस तत्परतेने कारचालकाचा शोध घेताना दिसत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case in pimpri chinchwad the incident was caught on cctv kjp 91 ssb