पुणे : करोनानंतर आता गृहसजावटीमध्ये नवे कल येऊ लागले आहेत. स्वयंपाकघर अधिक सुविधांनी सुसज्ज, जागा वाचवणारे फर्निचर, गॅलरीमध्ये सजावटीला विशेष पसंती दिली जात असून, घरातून काम करण्याची गरज लक्षात घेऊन त्यासाठीच्या सुविधाही निर्माण केल्या जात असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले.
हेही वाचा >>> पुणे : कार्बन उत्सर्जनविषयक कक्ष स्थापन करण्यास विभागीय आयुक्तांची मान्यता
करोनानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे कल निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. वेगाने विस्तारणाऱ्या पुण्यामध्ये गृहसजावट हे मोठे उद्योग क्षेत्र आहे. आकर्षक गृहसजावटीसाठी वैविध्यपूर्ण वस्तू, डिझाइन्सही उपलब्ध होऊ लागली आहेत. बैठकीची व्यवस्था, सुखसुविधा, दिवे, सजावट याचा विचार गृहसजावटीमध्ये केला जातो. करोनानंतर बदललेल्या गरजांचा परिणाम गृहसजावटीच्या क्षेत्रातही दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गृहसजावट क्षेत्रातील कंपनी होमलेनतर्फे व्यवसाय विस्तार करत पिंपरी-चिंचवड आणि लुल्लानगर येथे एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केली आहेत. गृहसजावटीतील नव्या कलांविषयी होमलेनचे संस्थापक आणि मुख्याधिकारी तनुज चौधरी म्हणाले, करोनानंतर ग्राहकांच्या आवडी बदलल्या आहेत. जागेचा अधिकाअधिक वापर करता येण्यासारखे फर्निचर करण्याबरोबर स्वयंपाकघर अधिक सुविधांनी सुसज्ज, गॅलरीत अधिक आकर्षक सजावट, घरातून काम करता येण्यासाठीची व्यवस्था करण्यास पसंती दिली जात आहे. विशेषतः स्वयंपाकघरातील सुविधांसाठीचा खर्च जवळपास ३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे दीड ते पाच लाख रुपये गृहसजावटीसाठी खर्च केले जातात.