पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला चौशिंग्याच्या दोन जोड्या देण्यात आल्या आहेत. बिलासपूर येथील कानन पेंढारी प्राणिसंग्रहालायातून या दोन जोड्या आणण्यात आल्या आहेत. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या मागणीनुसार हंपी येथील प्राणिसंग्रहालयातून दोन तरस आणि एक बिबट्याही देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पिंपरी: दागिन्याबाबत विचारल्याने मुलाने केले आईवर चाकूने वार

कात्रज येथील प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या प्राणिसंग्रहालयात पश्चिम घाटातील जैवविविधता दर्शविणारे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी अशा एकूण ६६ जातींचे प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयातील खंदक हे मोठे आणि नैसर्गिक आभासाचे आहेत. सध्या असलेल्या प्राण्यांमध्ये आशियाई सिंह, जंगली मांजर, लेपर्ड कट, जाएंट स्क्विरल, पिसोरी हरीण, खोकड, जंगली कुत्रे, तरस, लायन टेल मकाक इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये आता चौशिंगे, तरस आणि बिबट्याची भर पडली आहे. चौशिंग्याच्या दोन जोड्या बिलासपूर येथील कानन पेंढारी प्राणिसंग्रहालयात होत्या. छत्तीसगड वन विभागाने त्या प्राणिसंग्रहालयाला भेट दिल्या आहेत. चौशिंग्यांबरोबरच दोन तरस आणि एक बिबट्याही हंपी येथील अटल बिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून घेण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांची संख्या चार एवढी झाली असून त्यामध्ये तीन मादी आणि एक नर बिबट्याचा समावेश आहे. याशिवाय वाघ, हत्ती, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, शेकरू आदी प्राणीही संग्रहालयात असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली.