पिंपरी-चिंचवड : तब्बल सात कोटी रुपये किमतीचा अश्व…असे म्हटल्यास अविश्वसनीय वाटत असेल. पण, होय… पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शनामध्ये सात कोटी रुपयांचा जातीवंत अश्व पहायला मिळाला. तो दिसतो कसा…? हे पाहण्यासाठी अक्षरश: पशू प्रेमींची झुंबड उडाली आहे.

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे दि.२५ आणि दि. २६ नोव्हेंबर असे दोन दिवस भारतातील सर्वात मोठे देशी गोवंश व अश्व प्रदर्शन तसेच पशू आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…

आणखी वाचा-पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

या पशुप्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लालकंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गीर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय बैल तसेच मारवाडी व भीमथडी अश्व मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार आहे, असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे.

मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव आहे फ्रेंजेड जी. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे. फ्रेजेंडचा खुराक जाणून तुम्हालाही धक्का बसेल. घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा १५ लीटर दूध पितो. दररोज ५ किलो हरभरा आणि ५ किलो डाळी खातो. आणि हो फक्त ‘मिनरल वॉटर’च पितो. फ्रेजेंड हाइब्रिड असल्याचे घोडा मालक सांगतात. फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो ४ वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडने आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल ११०० हून अधिक स्पर्धांमध्ये तो ‘विजेता’ ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.

आणखी वाचा-बी. टी. कवडे रस्ता उड्डाणपूल परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग

युवराज हे व्यवसायाने जमीनदार आणि आडतदार आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. फ्रेंजेडच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. घोड्याची काळजी घेण्यासाठी चारजण नेहमी सोबत राहतात. घोड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खास रुग्णवाहिकेसारखी गाडी असते. घोड्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ तास एक डॉक्टरही तैनात असतो.