पुणे : शहर आणि परिसराच्या किमान तापमानात मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवारी, शिवाजीनगर परिसरात १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. वडगाव शेरी येथे २२.८ अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत जास्त किमान तापमानाची नोंद झाली आहे.

मागील आठवड्यात शहरातील कमाल तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यामुळे शहरात काहीसा गारठा जाणवत होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातही पुणेकरांना गारठ्याचा अनुभव घेता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता असल्यामुळे आणखी काही दिवस पुणेकरांना गारठ्याच्या अनुभवापासून वंचित राहवे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – जलमापक बसविण्यास विरोध केल्यास पोलीस कारवाई; पुणे महापालिकेचा निर्णय

वडगाव शेरीत २२.८ किमान तापमान

सोमवारी वडगाव शेरीत २२.८, मगरपट्ट्यात २२.८, चिंचवडमध्ये २२.३, लवळेत २१.८, खेडमध्ये २१.६, कोरेगाव पार्कमध्ये २१.४, लोणावळ्यात २०.९, पुरंदरमध्ये २०.७, राजगुरुनगरमध्ये २०.६, हडपसरमध्ये २०.५, लवासात १९.८, बारामतीत १९.७, शिरूरमध्ये १९.३, तळेगावात १८.७, शिवाजीनगरमध्ये १८.५, एनडीएत १८.३, पाषाणमध्ये १७,१ आणि हवेलीत १६.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – पुण्यात नव्या वर्षात पाणीकपात? जाणून घ्या कारण

शहरात पावसाची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी हवामान अशंतः ढगाळ राहण्याचा तर, २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Story img Loader