पुणे : औंध आयटी पार्क येथील इमारतीच्या छतावर असणाऱ्या हॉटेलला आग लागली. आगीत हॅाटेलमधील साहित्य जळून भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औंध येथील सानेवाडी परिसरात गायकवाड आयटी पार्क आहे. आयटी पार्कच्या छतावर एक हॉटेल असून बुधवारी सकाळी हॅाटेलमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. जवान तेथे घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. तासाभरानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली. आगीत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन अधिकारी राजेश जगताप आणि शिवाजी मेमाणे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. हॅाटेलमध्ये लागलेल्या आगीमागचे कारण समजू शकले नाही. शॅार्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली.