पुणे : डेक्कन जिमखाना नदीपात्रातील चौपाटी परिसरात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले हाॅटेल बंद करण्यास सांगितल्याने हाॅटेलचालकाने पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाशी अरेरावी केल्याची घटना घडली. पोलीस निरीक्षकाशी वाद घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हाॅटेलचालकास पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन हरिभाऊ भगरे (वय ३३, रा. कबीर बाग परिसर, नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नदीपात्रातील चौपाटी परिसरातील हाॅटेल सदगुरू मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होते. रात्रपाळीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. पोलिसांनी हाॅटेल बंद करणास सांगितले. त्या वेळी हाॅटेल चालक भगरेने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी भगरे याने पोलीस ठाण्यात वाद घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – ‘समृद्धी’वर आणखी एक ‘कलंक’! पशुधन चोरीचे प्रमाण वाढले, सहा अटकेत

‘तुला काय करायचे ते कर’, असे भगरे त्यांना म्हणाला. पोलीस निरीक्षक बहिरट यांच्याशी वाद घातला. एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भगरे याला अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.