पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. डेक्कनच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.
जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म कर्नाटकातल्या ओणिमजालू या गावातला होता. वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या एका नातेवाईकासोबत ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. तीन रुपये पगार असलेली नोकरी करत त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या रुपाली आणि वैशाली दोन्ही हॉटेलमध्ये काम करायला सुरूवात केली आणि नंतर त्यांचेच मालक झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
गेली अनेक दशकं पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपाली आणि आम्रपालीच्या माध्यमातून जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर टाकली. त्यांची हॉटेल ही पुण्याच्या राजकीय, सामजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्र राहिली आहेत. पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीतील ते अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीतलं तसेच पुणेकरांच्या मनातलं जगन्नाथ शेट्टी यांचे स्थान कायम राहील, असंही अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.