पुणे : कसबा पोटनिवडणुकीतील प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना गजबजलेल्या तपकीर गल्ली परिसरात चोरट्यांनी दोन सदनिका फोडून सात लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत सतीश कामतकर (वय ५२, रा. शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंट, तपकीर गल्ली, ५५५ बुधवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपकीर गल्ली गजबलेला भाग असून या ‌भागातील शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंटमध्ये कामतकर यांची सदनिका आहे. चोरट्यांनी कामतकर यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाट उचकटले. कपाटातील पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा तीन लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Winter, Gold Rate , Gold Rate Nagpur ,
सोन्याच्या दराने थंडीतही फोडला घाम… दर बघून…
Subhash Ghai
प्रसिद्ध दिग्दर्शकाने विकलं मुंबईतील घर; ८.७२ कोटीला घेतलेलं, आता मिळाले ‘इतके’ कोटी
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
Zero response for 713 houses out of 2264 houses of MHADA Konkan Board
म्हाडा कोकण मंडळाच्या घराकडे इच्छुकांची पाठ, २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद
Mohan Hirabai Hiralal passed away recently in Nagpur
एका चळवळीची अखेर!
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar 10 to 12 retake for this scene
‘बांगड्या गरम, बांगड्या गरम’चा सीन करण्यासाठी झेंडूने घेतले होते ‘इतके’ रिटेक, सायली भांडाकवठेकर म्हणाली…

हेही वाचा >>> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईला वेग, कसब्यात भरारी पथकाकडून साडेपाच लाखांची रोकड जप्त

याच परिसरातील आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना कसबा पेठ परिसरात दोन सदनिका फोडून सात लाखांचा ऐवज लांबविण्यात आल्यानेे खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader