पुणे : करोना संकटानंतर आलिशान घरांच्या मागणीत वाढ सुरू झाली. ही मागणी अद्यापही कमी झालेली नाही. यामुळे आलिशान घरांचा पुरवठा आणि विक्री यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत देशातील महानगरांमध्ये घरांची सरासरी किंमत १ कोटी २३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील महानगरांमधील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत देशभरात २ लाख २७ हजार ४०० घरांची विक्री झाली. या व्यवहारांचे एकूण मूल्य २ कोटी ७९ लाख ३०९ रुपये आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत २ लाख ३५ हजार २०० घरांची विक्री झाली होती आणि त्यांचे एकूण मूल्य २ कोटी ३५ लाख ८०० रुपये होते. यंदा सहामाहीत घरांच्या विक्रीत ३ टक्के घट झाली असली तरी एकूण घरांचे विक्री मूल्य १८ टक्क्यांनी वाढले आहे.

आणखी वाचा-पुण्यातील मांदेडे गावाची शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल! अनोख्या प्रकल्पाविषयी जाणून घ्या…

चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत १ कोटी २३ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत घरांची सरासरी किंमत १ कोटी रुपये होती. दिल्लीत घरांच्या सरासरी किमतीत सर्वाधिक ५५ टक्के वाढ झाली आहे. मुंबईत मात्र घरांच्या सरासरी किमतीत कोणतीही वाढ नोंदविण्यात आलेली नाही. यंदा पहिल्या सहामाहीत मुंबईत ७७ हजार ३३५ घरांची विक्री झाली असून, त्याखालोखाल पुण्यात ४० हजार १९०, दिल्ली ३२ हजार १२०, बंगळुरू ३१ हजार ३८०, हैदराबाद २७ हजार ८२०, चेन्नई ९ हजार ५३० आणि कोलकत्यात ५ हजार २६५ घरांची विक्री झाली.

आणखी वाचा-केंद्रीय मंत्री मोहोळांच्या पुण्यातील विमानतळ नापासवरून पास! नेमकं काय घडलं जाणून घ्या…

घरांच्या वाढत्या किमती (कोटी रुपयांत)

महानगर एप्रिल ते सप्टेंबर २०२४ किंमतएप्रिल ते सप्टेंबर २०२५ किंमत
बंगळुरू ०.८४१.२१
हैदराबाद ०.८४१.१५
चेन्नई ०.७२०.९५
पुणे ०.६६०.८५
कोलकता ०.५३०.६१
दिल्ली ०.९३१.४५
मुंबई १.४७१.४३
एकूण १.०० १.२३