पुणे : महाडीबीटी संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती याेजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून करण्यात येते. मात्र, शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही पुणे विभागातील महाविद्यालय, विद्यापीठे आणि संस्था स्तरावर ५ हजार ६४१ अर्ज प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. केशव तुपे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गाेखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामाेदर ठाकरसी महिला विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठांचे कुलसचिव, पुणे उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची तत्काळ पडताळणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अर्ज पडताळणी प्रलंबित राहिल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

हेही वाचा – शहरबात : रखडलेल्या प्राध्यापक भरतीचे गंभीर परिणाम

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ते २०२३-२४ या तीन वर्षांत पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत. त्यात महाविद्यालय स्तरावर पहिल्या हप्त्यासाठी २०२०-२१ मध्ये ९२, २०२१-२२ मध्ये ११८, २०२२-२३ मध्ये २१२, २०२३-२४ मध्ये ११२५ अर्ज प्रलंबित राहिले. तर दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर २०२०-२१ मध्ये ५७५, २०२१-२२ मध्ये ५२३, २०२२-२३ मध्ये ८३१, २०२३-२४ मध्ये २ हजार १७५ अर्ज प्रलंबित राहिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Pavana dam drowning: मुलगा पवना धरणात बुडाला; पालकांनी राज्य सरकारविरोधात दाखल केला खटला, म्हणाले…

महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांनी राेजच्या राेज कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून पडताळणी करणे आवश्यक आहे. काेणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठाच्या स्तरावर ऑनलाइन अर्ज प्रलंबित राहणार नाही याची नोंद घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. पडताळणी प्रलंबित राहिलेल्या अर्जांबाबत भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांसंबंधी विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही डॉ. तुपे यांनी नमूद केले.