पुणे : राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या दोन तासांत ५.७७ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत अजित पवार यांच्या भेटीला ?
हेही वाचा – माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी बारामती येथील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजाविला. तसेच आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले. सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात १४.६४ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक १८.६३ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल इंदापूर विधानसभा मतदारसंघात १४.६८ टक्के मतदान झाले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात १४.८ टक्के, खडकवासला विधानसभा मतदारसंघात १४ टक्के, भोर १३.८ टक्के, तर दौंडमध्ये १२ टक्के मतदान झाले आहे.